चांगलं काम उभारण्यासाठी शिक्षकांनी आपले ज्ञान समाजासाठी खर्ची करावे : नामदार हसन मुश्रीफ ; मुदाळ शहाजी पाटील यांच्या सेवापुर्ती निमित्त सत्कार संपन्न.

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सेवानिवृत्ती नंतर शिक्षकांनी आपल्या जवळ असणारे ज्ञान, आपली कुवत समाजासाठी खर्ची केली तर एक चांगलं काम उभा राहील, आदर्श समाज घडेल असा विश्वास व्यक्त करीत माजी आमदार के. पी. पाटील यांनी जे शिक्षण संकुल उभा केले आहे ज्यावेळी त्यांना माझी मदत लागेल ती पुर्ण करण्यासाठी मी हिमालया सारखा त्यांच्या पाठीशी उभा राहीन असे मत ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
ते सदगुरु बाळुमामा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित परशराम बाळाजी पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य शहाजी मारुती पाटील यांच्या सेवापुर्ती निमित्त आयोजित सपत्नीक सदिच्छा व सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के. पी .पाटील होते
स्वागत गोकुळचे संचालक, उपमुख्याध्यापक रणजीतसिंह पाटील यांनी केले. यावेळी डॉ. ए .एम .पाटील, नीलिमा पाटील, माजी आमदार के. पी .पाटील आमदार जयंत आसगावकर ,एस .एम.पाटील, एस. डी. लाड. यांची भाषणे झाली. सेवानिवृत्तीनिमित्त शहाजी पाटील यांचा सहपत्नीक नामदार मुश्रीफ व माजी आमदार के .पी.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्राचार्य शहाजी पाटील यांनी प्रसंगी पंचवीस हजार रुपये ची ग्रंथसंपदा व एलईडी टीव्ही शाळेचे उपमुख्याध्यापक रणजीतसिंह पाटील यांच्याकडे प्रदान केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, स्वामी वारके सूतगिरणीचे चेअरमन पंडितराव केणे ,कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड मुख्याध्यापक संघ कोल्हापूर चे चेअरमन सुरेश संकपाळ, बाळूमामा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विकासराव पाटील, उपाध्यक्ष एम. एस .पाटील कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद पांगीरेकर ,भुदरगड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष पाटील वजीर मकानदार ,रवी लाड ,सरपंच शितल माने, विजय गुरव ,विकास पाटील कुरुकलीकर ,आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन पी .जी.पाटील यांनी तर आभार एस .एस .कळंत्रे यांनी मानले