शिक्षक दिनी शाळेला गुरुजींकडून स्पिकर सेट भेट ; मुख्याध्यापक विलास पोवार यांचा आदर्शवत उपक्रम

बिद्री प्रतिनिधी
शिक्षक दिनानिमित्त शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याप्रसंगी विद्यार्थी आपल्या प्रिय शिक्षकांसाठी एखादी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करतात. परंतू शिक्षक दिनी गुरुजींनींच आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल १७ हजार रुपये किंमतीचा स्पिकर सेट भेट देऊन सांस्कृतिक कार्यक्रमाची सोय केली.
बिद्री केंद्राचे केंद्रप्रमुख व बोरवडे शाळेचे मुख्याध्यापक विलास पोवार यांनी बोरवडे ( ता. कागल ) येथील प्राथमिक शाळेला हा स्पिकर भेट दिला. शाळेच्या दैनंदिन परिपाठ व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्पिकर सेटची असलेली गरज ओळखून मुख्याध्यापक श्री. पोवार यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेला ही भेट दिली.या भेटीबद्दल शाळेच्या वतीने दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कावेरी चव्हाण, रेखा चव्हाण, अनिल शेणवी, नामदेव व्हरकट, बेबीताई कदम, सविता पाटील, युवराज सातुसे, सचिन कांबळे, हिरा भोये, कल्पना कुदळे, फराकटेवाडीचे मुख्याध्यापक पांडूरंग पाटील, वैशाली मांडवकर आदी उपस्थित होते.