कोविड १९ लसीकरण शासकीय मोहिम न रहाता लोक चळवळ बनावी :एस बी खोत

धामोड प्रतिनिधी :
धामोड ता. राधानगरी येथील सहयाद्री हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज धामोड येथे आर्टस् , सायन्स व आयटीआय विभागात जवळपास शंभरहून अधिक विद्यार्थांचे लसीकरण मोहिम यशस्वी झाले .कोविड १९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेतर्गंत १५ ते १८ वर्षे वयोग तील मुलांची लसीकरण मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र धामोड यांच्या वतीने पहिल्या टप्प्यात आर्टस्, सायन्स व आय टी आय तुळशी धरण धामोड या सह्याद्री शिक्षण संकुलात राबविण्यात आली याचा लाभ संकुलातील १०० विद्यार्थ्यांना झाला .
कॉलेज विभागप्रमुख प्रा.ए.एस.भागाजे यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्वागत व प्रास्ताविक केले.
त्यानंतर श्री.एस.बी.खोत यांनी लसीकरण मोहिमेचा हेतू व आवश्यकता याबाबत सुंदर विवेचन करून विद्यार्थ्यांमधील अनामिक भिती दूर केले.कोविड १९ लसीकरण मोहिम ही केवळ शासकीय मोहिम न रहाता ती लोक चळवळ बनावी असा आशावाद त्यानी व्यक्त केला .
सदर लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी डॉ एस एस राणखाम यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस पालकर , के जी लाड , एस व्ही गवळी , एफ एम पठाण , ए बी डोंगळे , आर बी आंबर्गी , पी पी रोगे, कविता पाटील , मंगल पाटील , एस व्ही फडतारे या धामोड प्राथमिक आरोग्य केंद्रातील अन्य वैद्यकीय कर्मचारी , पारिचारिका, आशा वर्कर्स या टिमने ही मोहिम् यशस्वी केले
यावेळी कॉलेज व आय टी आय युनिटच्या वतीने प्रा डी के पाटील , प्रा आकाश पाटील , प्रा दिपक चौगले , प्रा.एस बी चौगले , यानी सर्व अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्यब ग्रंथ भेट देऊन आभार व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा दिंडे यांनी तर आभार किरण -हायकर यांनी मानले .