लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलातील पै.तन्वी मगदूमची आशियाई स्पर्धेत निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
व्हिएतनाम येथे दि. १८ ते २६ जून २०२५ रोजी होणाऱ्या २३ वर्षाखालील वरिष्ठ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या ५९ किलो वजनगटातील कुस्ती स्पर्धेसाठी मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलातील मल्ल तन्वी मगदूम हिची आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दिल्ली येथे दि.२३ मे २०२५ रोजी झालेल्या राष्ट्रीय भारतीय संघ निवड चाचणी स्पर्धेत हरियाणाच्या आंतरराष्ट्रीय पैलवान अंजली हिच्यावर १०-० गुणांनी मात करून तन्वीने आशियाई स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले.
तन्वी आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तिला राष्ट्रीय प्रशिक्षक दादासो लवटे, वस्ताद सुखदेव येडकर, सागर देसाई, दयानंद खतकर यांच्याकडून मार्गदर्शन मिळत आहे, तर माजी खासदार संजय मंडलिक, अॅड. विरेंद्र मंडलिक, समन्वयक चंद्रकांत चव्हाण यांच्याकडून प्रोत्साहन मिळाले.