विशेष लेख : स्कॉटलंड यार्ड झिंदाबाद मुंबई पोलिस झिरोवर बाद

शब्दांकन : व्ही.आर.भोसले
मुंबई इंडियनस ची आय पी एल मधील कामगिरी अत्यंत सुमार ठरली आहे .यापुर्वी तीन वेळा अजिंक्य ठरलेल्या संघाची ही दयनीय अवस्था का बरे व्हावी ?
कुणीतरी त्यावर अगदी हास्यास्पद प्रतिक्रिया दिलीय.
मुंबईचे नाव खराब करण्यासाठीच आयपीएल मध्ये कट शिजला असावा .
‘नाचता येईना अंगण वाकडे ‘
हे खरं तर मुंबई क्रिकेट च उदाहरण झालं .मुंबईचं नाव जस आयपीएल जस खराब झालंय तसं मुंबई पोलिसांच नावही खराब होत आहे.
इंग्लडच्या स्कॉटलंड यार्ड बरोबर मुंबई पोलिसांची तुलना व्हायची .अन का होऊ नये .?
बॉलिवूडचे कलाकार मुंबई पोलिसांसाठी जीव ओतून काम करतात .आदरपूर्वक नतमस्तक होतात . सुंदर इंग्रजी हिंदी मध्ये कौतुक सुमने उधळण्यासाठी त्यांनी कसलीही कसूर सोडली नाही.
याच कारणही तसंच आहे .
तीसेक वर्षापूर्वी दाऊद च्या एका कार्यक्रमात हे कलाकार दुबईत जाऊन नाचले होते .अनील कपूर,गोविंदा ,जॉनी लिव्हर असे नामवंत कलाकार होते .दिलीपकुमार, अमिताभ बच्चन असे दिग्गज मात्र नव्हते .
जे तेथे गेले होते ते अंडर वर्ड च्या दशहतीमुळे गेले होते .कांही तारका ही या दशहतीला बळी पडल्या.
मुंबईतल्या अंडर वर्ड चे कंबरडे मोडले ते ‘मुंबई पोलीस ‘
नावाच्या बहाद्दरानी .
आठवतंय का पहा .जॉनी लिव्हर ने दाऊदच्या कार्यक्रमात ‘जन गण मन ‘ या भारतीय राष्ट्रगीताचा अवमान केला होता म्हणून मुंबई पोलिसांनी त्याला फरफटत आणला होता .
बॉलिवूडचा नशाच केवळ उतरला नाही तर नूरही बदलून गेला .
तेंव्हापासून आजतागायत हा दबदबा कायम होता .
.तडफदार ,कर्तव्यदक्ष आणि वर्दीशी इमान राखणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर दक्षिणेत अनेक निघाले .नायक नायिकां ना झाडामागे पळवून प्रणयदृशे दाखवणाऱ्या बॉलीवुड निर्मात्यांनाही दक्षिणेच्या पोलिसी चित्रपटांनी भुरळ घातली .
त्यावरून सिंघम,दबंग सारखे चित्रपट निघू लागले .आताच्या तानाजी ,पावनखिंड ,शेरशिवाजी सारखी त्यांना रसिकांनी डोक्यावर घेतलं होतं .
थोडक्यात काय तर कर्तव्यकठोरता आणि प्रमाणिकपणावर लोक प्रेम करतात .त्यांच्या बद्धल त्यांना विश्वास वाटत असतो .किंबहुना असे अधिकारी त्यांचे नायक ठरत असतात .
मुंबई पोलिसांचा हा दबदबा आता उतरतीला का लागावा .?
याच कारण मुंबई पोलिसांचा सत्तेच्या राजकारणात होत असलेला वापर हे होय.
कायदा आणि सुव्यवस्था (law and order ) राखणे हे पोलिसांचे खरे काम .पण ते दुय्यम बनले आहे .
सत्ता ही भोगण्यासाठी नव्हे तर सेवेसाठी असते हे ब्रीद सत्ताधारी विसरलेले आहेत व ‘ सद्द्रक्षणाय खलनिर्दालणाय ‘ हे पोलिसांचे ब्रीद त्यांना विसरायला लावले आहे.
मुंबईचे पोलिस प्रमुख परमवीर सिंग आणि तत्कालीन गृहमंत्री अनील देशमुख यांना रान मोकळे करून दिले होते .
ते आता जेल,बेल आणि कोर्टाच्या फेऱ्यात अडकलेत .
मुबई पोलिसांचे आताचे म्होरके तरी काय करतात ?
राणा दाम्पत्याला अटक झाली .एक गुन्हा पुरणार नाही म्हणून दुसरा घातला .त्यात देशद्रोहाचा गुन्हा म्हणजे हद्द झाली.
त्यांना भेटायला आलेल्या सोमय्यांच्या गाडीवर दगड मारले .काच फुटली ,रक्त आलं .कायद्याच्या भाषेत ही ‘हाफ मर्डर ‘ केस झाली .महाराष्ट्राने आणि कोर्टातल्या जज्ज महोदयांनी पण टीव्ही वर हे दृश्य पाहिलं .शेकडो कॅमेऱ्यात ते दृश्य कैद झाले.टीव्ही वरचे लाल बाण वारंवार ते दृश्य दाखवत होते.
,मुंबई पोलिसांनी त्यांचा एफ आय आर पण नोंदवला नाही कारण त्यांना ते दृश्य दिसलेच नाही .बहुतेक ते पत्ते खेळत बसले असावेत .
पूर्वीचे गृह मंत्री छगन भुजबळ म्हणाले की ते रक्त खरे की नकली .
एके काळी ते बाळासाहेब ठाकरे ना त्यांनी अटक करून दाखवली होती .
अलीकडे त्यांना नावा वरून कुणीतरी ‘बाहुबली’ची उपमा दिली म्हणे .
मुंबई पोलिसांच्या या ‘माजी मुखींयाला सोमयांचे रक्त नकली वाटावे यात कोणाची बदनामी झाली ?
भुजबळांची जेल वारी झाली असल्याने त्यांना बदनामीचे विशेष वाटत नसावे .
यात मुंबई पोलिस बदनाम झाले .
खासदार नवनीत राणांना पोलिस कोठडीत वॉशरूम ला जाऊ दिले नाही की प्यायला पाणी दिले नाही .
आरोपी असल्या तरी माणूस म्हणून मानवता धर्म पाळला पाहिजे असे भगिनी समान असलेल्या महिला कॉन्स्टेबल ना वाटले नसेल का ?
त्यांना वरून कोणाचे आदेश होते ?
बदनामी आदेश देणाऱ्यांची झालीच पण त्याहून अधिक मुंबई पोलिसांची झाली .
याच पोलिसांनी बिहारच्या आय पी एस अधिकाऱ्यांस सुशांत प्रकरणात हॉस्टेल मध्ये डांबले होते .
हे काय वरच्या आदेशाशिवाय झाले होते .?
एके काळच्या रेल्वेतील पाकीट मारीला मुंबई पोलिसांनी पूर्ण कुलूप बंद करून टाकले आहे. रात्री अपरात्री तरुण महिला ओला टॉक्सिने,रिक्षा ने लोकल ने बिनधास्त फिरतात ते मुंबई पोलीस भैय्या च्या भरोस्या वर .
मग सहा लाख लोकांची प्रतिनिधी असलेल्या खासदार नवनीत राणांना माणुसकी शून्य वागणूक का ?
कोणाचे आदेश होते ,?
इंग्लडचे स्कॉटलंड यार्ड आजही जगात वरच्या क्रमांकावर आहे .
त्याच्या पंक्तीत बसलेल्या मुंबई पोलिसांना भरल्या पंक्तीतून उठवले कोणी ?
आय पी एल च्या भाषेत बोलायचे झाले तर
स्कॉटलंड यार्ड झिंदाबाद
मात्र
मुंबई पोलिस झेरोवर बाद .
अर्थात दोष त्यांचा नाही. त्यांना चुकीचे आदेश देणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी त्यांना ‘आऊट’केले आहे
शब्दांकन : व्ही.आर.भोसले