टाकवडे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा……..!

टाकवडे प्रतिनिधी :
टाकवडे गावचे नवयुवक पत्रकार, ज्यांच्या लेखणीत ठिणग्या असतात,धारधार लेखणी,अन्यायाविरुध्द सडेतोड निर्भिड लिखाण अशी ओळख असलेले विनायक कदम यांच्यामुळे टाकवडे गावच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
मानवाधिकार सुरक्षा संघ मुख्य प्रमोटर विवेक जी ओबेरॉय, चेअरमन हरित हरिश्चंद्रा सर यांच्या आदेशानुसार ,Adv. अनिल तोष्णीवाल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,महिला प्रदेश अध्यक्ष भावनाताई थोरात,महामंत्री प्रतिभाताई दुसाने यांच्या नेतृत्वाखाली आज विनायक कदम यांची मानवाधिकार सुरक्षा संघ कोल्हापूर जिल्हा Media Head म्हणुुन नियुक्ती करण्यात आलेली आहे.हि नियुक्ती कोल्हापुरच्या जेष्ठ शिवसैनिक व कोल्हापुर महीला मानवधिकार समिती अध्यक्ष जयश्री खोत यांच्या हस्ते झाली.आणि त्यांनी पुढील वाट चालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.
या नेमणुकीचे ओळख पत्र व सन्मान म्हणुन शाल व श्रीफळ जयश्री खोत ताईंनी त्यांच्या घरी दिले,यावेळी मानवधिकार इचलतकंजीचे योगेश खारगे,शिवसैनिक व मित्रमंडळी उपस्थित होते.विनायक यांनी सर्वांचे आभार मानले.