ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसियशन (पत्रकार संघटना) भुदरगड तालुकाध्यक्षपदी शैलेंद्र उळेगड्डी यांची निवड.

गारगोटी प्रतिनिधी :

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसियशन भुदरगड तालुका सन २०२२ सालाकरिता पदाधिकारी निवडी एकमताने संपन्न झाल्या. यावेळी दैनिक पुन्यनगरी चे कडगांव प्रतिनिधी शैलेंद्र उळेगड्डी यांची भुदरगड तालुका अध्यक्षपदी निवड झाली. तर उपाध्यक्षपदी महान कार्य चे मोहन पाटील व हरिश्श्चंद्र देसाई यांची निवड झाली. कार्याध्यक्ष म्हणून दैनिक पुढारीचे कडगांव प्रतिनिधी रविंद्र देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. सचिव म्हणून दैनिक पुण्यनगरीचे नामदेव पाटील यांना जबाबदारी देण्यात आली.खजिनदार पदी महान कार्य चे अजित यादव यांची निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष म्हणून दैनिक सकाळ चे संतोष भोसले यांचे नाव निश्चीत करण्यात आले.

पदाधिकाऱ्यांच्या निवडीबध्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले. विद्यमान अध्यक्ष पत्रकार सुभाष माने यांनी या वर्षीच्या जमा खर्चाचा लेखाजोखा मांडला. संघटना ही पत्रकारापेक्षा मोठी आहे. संघटनेच्याच माध्यमातूनच पत्रकारांचे हित चांगल्या प्रकारे जोपासले जाते. त्यामूळे सर्व पत्रकारांनी संघटनेच्या अटी नियमास अधिन राहून वाटचाल करावी असे त्यांनी सुचित केले.

भुदरगड तालुका संपर्क प्रमुख बी. के. कवडे यांनी जिल्हा पत्रकार संघटनेची ध्येय धोरणे विषद केली.उपस्थीत पत्रकारांना मार्गदर्शक सुचना केल्या. पत्रकारांचे विमा संरक्षण, वैद्यकिय सेवा, जागल्या स्मरणिका प्रकाशन, जाहिरात संकलन, पत्रकार भवन आदि विषय सविस्तर मांडले.

यावेळी माजी अध्यक्ष शिवाजी खतकर, डी. वाय. देसाई, प्रकाश खतकर, मंगेश कोरे, गजानन देसाई, बाजीराव देसाई, प्रकाश सांडुगडे, रमेश नांदूलकर, समिर मकानदार, विक्रम केंजळेकर, रविंद्र खेतल आदि पत्रकार उपस्थीत होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks