घुणकी गावात तहसिलदारांची पूरग्रस्तांना भेट !

घुणकी :
संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकुळ सुरूच ठेवल्याने राज्य सरकारचे धाबे दणाणून गेले आहे. इकडे कोल्हापूर जिल्ह्यात चांदोली, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस बरसत असल्याने तसेच वारणा नदीचा विसर्ग वाढल्याने नद्या काठांच्या गावातील नागरिकांना स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे.याचाच एक भाग म्हणून नदी काठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे ग्रामपंचायतीने सुरुवात केली आहे. गावातील दलित वस्तीत पाणी घुसल्याने तेथील नागरिकांचे तातडीने स्थलांतर गावातील मराठी शाळेच्या वर्गात ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले. सदर प्रशासनाकडून राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
तहसीलदार यांची भेट !
या नागरिकांची केलेली सोयी व तेथील पाहणी करण्यासाठी हातकणंगले अप्पर तहसीलदार महेश खिलारी यांनी भेटून विचारपूस केली आणि तुम्हाला कोणत्याही गोष्टींची मदत लागली तर आम्हाला जरूर कळवा असे ही सांगितले आहे.
यावेळी ग्रामसेवक विजयकुमार पाटील , तलाठी प्रदीप काळे, आरोग्य सेवक विजय माने, ग्राम सदस्य किरण मोहिते, वारणा कारखाना संचालक सुभाष जाधव, ग्राम वरिष्ठ लिफिक प्रदीप मोहिते, कनिष्ठ लिपिक श्रीकांत मोहिते, पत्रकार सचिन कांबळे, गौतम कांबळे, आदी कर्मचारी उपस्थित होते..