ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगुड : विवाहितेवर अतिप्रसंग करणाऱ्यास एकास दीड वर्षाचा कारावास

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील हळदवडे येथील विवाहितेवर अतिप्रसंग करणाऱ्या पांडुरंग भराडे (वय ५०) यास दीड वर्षाचा कारावास व दहा हजार दंडाची शिक्षा शनिवारी कागल न्यायालयाने ठोठावली
१४ सप्टेंबर २०२१ रोजी पीडित महिला श्री गणेश दूध डेअरीमध्ये दूध घालून घरी परत जात असताना पांडुरंग भराडे याने महिलेच्या तोंडावर बॅटरीचा प्रकाश पाडून गोठ्यामध्ये नेऊन लज्जा उत्पन्न होईल. असे वर्तन केले. महिलेने आरडाओरड केल्यानंतर संशयिताने तेथून पळ काढला.
या प्रकरणाची आज कागल प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. भराडे यास दोषी ठरवून दीड वर्षाचा कारावास व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली. या गुन्ह्याची मुरगूड पोलिसात नोंद झाली आहे.