दिवाळीपर्यंत थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तोडू नये; ‘आप’ची महावितरणकडे मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोरोना काळात थकीत राहिलेल्या विजबिलांची वसूली महावितरणकडून केली जात आहे. शहरातील बहुतांश ग्राहकांनी संपूर्ण बिले भरली आहेत. काही ग्राहकांची आर्थिक स्थिती आता कुठेतरी सुरळीत होत असल्याने ते बिलाचे हफ्ते भरून थकबाकी कमी करत आहेत. परंतु महावितरणकडून संपूर्ण थकबाकी भरण्यासाठी तगादा लावला जात असल्याने ग्राहकांची दिवाळी अंधारमय होण्याची शक्यता आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडू नये अशी मागणी आम आदमी पार्टीने महावितरणचे कार्यकारी अभियंता सुनीलकुमार माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत दिवाळीच्या काळात कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही या मागणीचा आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करून विजतोडणी थांबवू अशी ग्वाही अभियंता माने यांनी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांना दिली.
यावेळी युवाध्यक्ष उत्तम पाटील, शहर संघटनमंत्री सूरज सुर्वे, राज कोरगावकर, बसवराज हदीमनी आदी उपस्थित होते.