ताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारत-चीन युध्दात सहभागी व निवृत्ती वेतन मिळत नसलेल्या माजी सैनिकांना प्रत्यक्ष भेटण्याचे आवाहन

कोल्हापूर :- रोहन भिऊंगडे

1962, 1965 आणि 1971 च्या भारत-चीन/पाकिस्तान युध्दात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या व निवृत्ती वेतन मिळत नसलेल्या माजी सैनिक/विधवा यांनी आपले ओळखपत्र, डिस्चार्ज पुस्तक व युध्दात सहभागी झाल्याप्रित्यर्थ प्रदान केलेल्या नमुद पदकाच्या पुराव्यासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे दि. 10 एप्रिलपर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष भेट देण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
भारत सरकारव्दारा 1962 च्या भारत-चीन युध्दामध्ये सहभागी सैनिकांना LADAKH-1962 CLASP/NEFA-1962CLASP हे पदक, 1965 च्या भारत-पाकिस्तान युध्दात सहभागी सैनिकांना रक्षा पदक/समर सेवा स्टार हे पदक व 1971 च्या भारत-पाकिस्तान युध्दात सहभागी सैनिकांना संग्राम पदक प्रदान करण्यात आले असल्याचेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks