ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक

बिद्री : ‘ दूधसाखर ‘ महाविद्यालय च्या प्राचार्यपदी डॉ. संजय पाटील यांची निवड

बिद्री प्रतिनिधी :

येथील दूधसाखर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. संजय पाटील यांची निवड झाली.ते गेली तीस वर्षे या महाविद्यालयात कार्यरत असून अडीच वर्षे त्यांनी प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यभार सांभाळला आहे.डॉ.पाटील हे शिवाजी विद्यापीठाकडे एम.फील.,पीएच.डी.चे मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक विद्यार्थी पीएच.डी.धारक झाला आहे , तर तीन विद्यार्थी संशोधन करीत आहेत. त्यांचे आतापर्यंत आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय , राज्यस्तरीय असे ६३ शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
डॉ. पाटील यांचे ‘ महादेव मोरे यांचे साहित्य ‘ हे पुस्तक प्रकाशित झाले असून शिवाजी विद्यापीठासह अन्य विद्यापीठात संदर्भ ग्रंथ म्हणून लागलेले आहे.त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे खजीनदार म्हणून काम पाहिले आहे.अध्ययन, अध्यापनाबरोबर त्यांनी अभ्यासेत्तर उपक्रमामध्ये व्यसनमुक्ती,अंधश्रद्धा निर्मूलन, नकुशी नावाच्या मुलींचे नामांतर व शैक्षणिक पालकत्व, वाढदिवसाच्या निमित्ताने वाचनकट्टे बांधणे, ३१ डिसेंबर दिवशी दूधवाटप, महाविद्यालयाच्या परिसरातील शाळा व गावागावातून प्रबोधनपर व्याख्याने असे उपक्रम राबविले आहेत.
त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्काराने गौरविले आहे. शिवाजी विद्यापिठाने त्यांच्या पीएच.डी. प्रबंधास डॉ. व्ही.आर.करंदीकर पारितोषिक दिले आहे तर पुस्तकाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूरचा उत्कृष्ट ग्रंथ म्हणून पुरस्कार मिळाला आहे.जिल्हा दारूबंदी अधिकारी, कोल्हापूर यांनी व्यसनमुक्ती कार्यकर्ता प्रमाणपत्र दिले आहे. राष्ट्रीय सेवा योजना समितीच्या कामाची दखल घेऊन शिवाजी विद्यापीठाने उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी म्हणून गौरविले आहे. तर गेल्या वर्षी शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचा पहिलाच गुणवंत शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
या निवडीसाठी त्यांना संस्था अध्यक्ष माजी आमदार के.पी. पाटील,उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे , सचिव एस.ए. कुलकर्णी व सर्व संचालक मंडळाचे सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks