नेसरीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षस्थानी मज्जीद वाटंगी

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
नेसरी ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी तंटामुक्त समिती नेमण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन रवळनाथ मंदिर येथे करण्यात आले या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मज्जीद वाटंगी व अन्य सदस्यांची निवड करण्यात आली.
अध्यक्षस्थांनी सरपंच गिरीजादेवी शिंदे होत्या बबन पाटील यांनी समितीच्या अध्यक्षस्थानी मज्जीद वाटंगी यांच्यासह एम एस तेली,वकील प्रतिनिधी वकील विलास नाईक,पत्रकार विनायक पाटील,माजी सैनिक बाळासाहेब नावलगी,माजी पोलीस रामा भोसले,पदवीधर विश्वनाथ रेळेकर, वीज वितरणचे संजय नाईक,डॉ विनायक देसाई यांची नावे वाचून निवड करण्याची मागणी करण्यात आली यावर मंजुरीच्या घोषणांनी सर्व नावे मंजूर झाली ग्रामसभेच्या अध्यक्षा सरपंच गिरीजादेवी शिंदे यांनी आभार मानून सांगता केली.
यावेळी स्थानिक देवस्थान समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह शिंदे,पो पा उदय देसाई,उपसरपंच प्रथमेश दळवी, सदस्य यशवंत देसाई, अशोक पांडव,मुस्तफा मुजावर ,किरण हिडदुग्गी, प्रकाश मुरकुटे, वंदना नांदवडेकर, चेतना इंगवले,शांता सुतार,ज्योती देसाई,कमल नाईक,यांचेसह उस्मान कदीम,चंद्रकांत शिंदे,प्रकाश दळवी,वसंत पाटील,संजय सुतार,आशिष साखरे,भिकाजी दळवी,पवन पाटील,श्रावण कांबळे, संजय कांबळे, महादेव चव्हाण,संतोष नाईक,विलास हल्याळी,शहजाद वाटंगी,व ग्रामस्थ हजर होते आभार रुकसार नुलकर यांनी मानले.