ताज्या बातम्यामहाराष्ट्र
चंदगडच्या वाहतूक नियंत्रकांना मारहाण ; तिघांना अटक

चंदगड प्रतिनिधी :
एसटी संपात सहभागी न झाल्याच्या कारणावरून चंदगड एसटी डेपोच्या वाहतूक नियंत्रकांना मारहाण केल्याप्रकरणी चंदगड एसटी डेपोतील तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
सचिन रामराव मुंडे (वय ३८) असे वाहतूक नियंत्रकांचे नाव असून, ए. डी. मोराळे, एस. टी. नागरगोजे, गोविंद दराडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मुंडे हे चंदगड एसटी डेपोट वाहतूक नियंत्रक असून, आरोपी येथे वाहक-चालक म्हणून नोकरीस आहेत. मुंडे हे संपामध्ये सहभाग न होता एसटी डेपोत कामावर गेले होते. शुक्रवारी रात्री ते जेवण करण्याकरिता घरी जात असतान आरोपींनी त्यांना मारहाण केली याप्रकरणी मुंडे यांच्या फिर्यादीवरून चंदगड पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक जमादार तपास करीत आहेत.