जीवनमंत्रताज्या बातम्या

इतिहास विषयाचे अध्यापन हे तर्क दृष्टीने करावे : भाऊसाहेब उमाटे

गारगोटी :

श्री मौनी विद्यापीठ संचलित आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी येथे बी.एड.प्रथम वर्ष 2020-21 सत्र दोन साठी शालेय विषयाचे अध्यापनशास्त्रसाठी सामाजिक शास्त्रे मंडळाने आयोजित करण्यात आलेल्या अनुभवी इतिहास अभ्यासक, लेखक व उपक्रमशील अध्यापक मुलाखतीमध्ये मुलाखत देताना श्री भाऊसो उमाटे बोलत होते.

इतिहास विषयाच्या अध्यापनामध्ये येणाऱ्या समस्या, इतिहासाचे अध्यापन कसे करावे, इतिहास अध्यापनासाठी कोणकोणत्या क्लुप्त्या वापराव्या, इतिहास विषयाच्या अध्यापनामध्ये अध्यापन करत असताना येणाऱ्या समस्यांचे निराकरण कसे करावे. असे इतिहास विषयाच्या अध्ययन,अध्यापन, मूल्यमापन, व्यवसायिक विकास इत्यादीसंबंधित प्रश्नावर छात्र प्रशिक्षणार्थ्यांनी श्री भाऊसो उमाटे सर यांच्याबरोबर या मुलाखतीमध्ये चर्चा केली.या मुलाखतीमध्ये महाविद्यालयाचे छात्रप्रशिक्षणार्थी धनश्री पवार , जॉर्ज डिमेलो व रणजित मोरे यांनी ऑनलाईन प्रक्रीयेने गूगल मिटिंगद्वारे श्री भाऊसो उमाटे सहाय्यक शिक्षक श्री ज्ञानेश्वर विद्यालय, लातूर यांची मुलाखत घेतली.

मुलाखतीमध्ये भाऊसो उमाटे यांनी इतिहास विषयाचे महत्त्व, इतिहास विषयाच्या संकल्पना, इतिहास विषयाची उद्दिष्टे, इतिहास विषयांमध्ये अध्यापन करताना घ्यावयाची काळजी, इतिहास विषयांमध्ये कोणत्या अध्यापन पद्धतीला जास्त महत्त्व दिले पाहिजे. इतिहास विषयातील सनावळ्याकडे अध्यापकांनी कशाप्रकारे पाहिले पाहिजे? इतिहास विषय आजच्या काळाची का गरज आहे. या आणि इतिहास अध्यापन पूरक विषयावर भाऊसो उमाटे यांनी प्रशिक्षणार्थीसोबत मुलाखतीद्वारे मुक्त संवाद साधला.
या मुलाखत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक व सामाजिक शास्त्रे मंडळाचे मार्गदर्शक डॉ. आर. के. शेळके होते. डॉ.आर. के. शेळके यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये भाऊसाहेब उमाटे यांच्या कार्याचे वर्णन करून चांगला इतिहास अध्यापक कसा असावा यासंबधी मार्गदर्शन केले.तसेच मौनी विद्यापीठाचे महत्त्व विशद केले. इतिहास अध्यापनामध्ये कोण कोणत्या क्लृप्त्या वापरून अध्यापन करायचे हे थोडक्यात सांगितले त्याचबरोबर मौनी विद्यापीठाचे शिल्पकार डॉ. जे. पी.नाईक यांचे भारतीय शिक्षण क्षेत्रातले महत्व विशद केले.

मुलाखत कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रम पत्रिका उद्घाटनाने झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा कलकुटकी यांनी केले. प्रास्ताविक शिवाजी गावडे यांनी केले. पाहुण्यांची ओळख जॉर्ज डिमेलो यांनी केले. या कार्यक्रमासाठी बी.एड. प्रथम वर्षाचे सामाजिक शास्त्र मंडळाचे सर्व छात्र प्रशिक्षणार्थी ऑनलाइन तसेच ऑफलाईन उपस्थित होते. कार्यक्रमाचा शेवट अतुल चौगुले यांनी आभार मानून केले.या कार्यक्रम संयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री मौनी विद्यापीठाचे संचालक डॉ. आर. डी. बेलेकर यांची प्रेरणा मिळाली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks