कडगाव हायस्कूलमध्ये हिंदी दिन उत्साहात संपन्न.

कडगाव :
हिंदी भाषा भारतातील लोकांना जोडण्याचे काम करते .हिंदी केवळ भाषा नव्हे तर ती संपर्क भाषा, राजभाषा आहे .असे मत महाराष्ट्र बँकेचे कडगाव शाखेचे कॅशियर मा. श्री. श्रीकांत कांबळे यांनी व्यक्त केले. कडगाव हायस्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय कडगाव यांच्या वतीने आयोजित हिंदी दिवस कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. आर. डी .पोवार होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हिंदी वक्तृत्व स्पर्धेमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि शालेय साहित्य देऊन सत्कार करण्यात आला.
लहान गटामध्ये स्वरांजली धनाजी गोजारे हिने प्रथम क्रमांक स्मिता रवींद्र सरबलकर यांनी द्वितीय क्रमांक आणि सृष्टी संतोष शिंदे हिने तिसरा क्रमांक प्राप्त केला.
मोठ्या गटामध्ये स्वरा संतोष मुळीक हिने प्रथम क्रमांक विदीशा विठ्ठल देसाई हिने दुसरा क्रमांक शिवानी विजय संकपाळ हिने तिसरा क्रमांक प्राप्त केला श्री. वजीर मकानदार यांनी हिंदी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले .सूत्रसंचालन कुमारी हर्षदा सुतार हिने केले स्वागत व प्रास्ताविक सत्यजित चोरगे यांनी केले तर आभार कुमारी मधुरा पवार हिने मानले.