‘शाहू’च्या आधुनिक तंत्रज्ञान माहितीचा उपयोग करून घेऊन शेतकऱ्यांनी ऊसाचे उत्पादन वाढवावे : राजे समरजितसिंह घाटगे ; सिद्धनेर्लीत ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
ऊसाचे उत्पादन वाढविल्याशिवाय ऊस शेती परवडणार नाही. यासाठी शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सीएनजीचलित ट्रॕक्टर,ड्रोनद्वारे फवारणी अशा अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येत आहे. त्याचा ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांनी उपयोग करून घेवुन ऊसाचे उत्पादन वाढवावे. असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित़सिंह घाटगे यांनी केले.
सिद्धनेर्ली येथे सिद्धेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे श्री.छत्रपती शाहू साखर कारखान्यामार्फत ठिबक सिंचनद्वारे एकरी शंभर मे.टन ऊस उत्पादन तंत्र या विषयावर आयोजित ऊस विकास परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
घाटगे पुढे म्हणाले शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहराजे घाटगे यांनी शेतकऱ्यांचे ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी विविध ऊस विकास योजना सुरू केल्या. ठिबक सिंचनला व महिला शेतकरी यांना जादा अनुदान देणारा शाहू साखर कारखाना पहिला कारखाना आहे. शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसह खर्चात बचत करणेची गरज आहे.
यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय माळी म्हणाले
एकरी तीस टनाखाली ऊस उत्पादन शेती परवडत नाही. ऊस शेतीत पाण्याच्या अतिवापरामुळे जमीनीची प्रत खालावत आहे.जमिनीत कायम वाफसा असणे गरजेचे आहे.त्यासाठी ऊस शेतीत ठिबक सिंचन फायदेशीर आहे.ठिबकच्या वापरातून एकरी 100मे.टन ऊत्पादन घेणे सहज शक्य आहे.
स्वागत शेती आधिकारी रमेश गंगाई यांनी केले.पाहुण्यांची ओळख ऊस विकास आधिकारी दिलीप जाथव यांनी करुन दिली.प्रास्ताविक शाहुचे संचालक प्रा. सुनिल मगदुम यांनी केले. तर आभार संचालक सचिन मगदुम यांनी मानले.
पाणीपुरवठा संस्था ठिबक खाली आणणार-घाटगे……
शाहू साखर कारखान्याच्या पुढाकारातून कार्यक्षेत्रात सहकारी तत्त्वावरील पाणीपुरवठा योजना यशस्वीपणे कार्यान्वित केल्या आहेत. ऊस शेतीत ठिबक सिंचनची उपयुक्तता पाहता त्याच धर्तीवर या योजना ठिबक सिंचन खाली आणण्याचे कारखाना व्यवस्थापनाचे नियोजन आहे.अशी माहिती यावेळी श्री घाटगे यांनी दिली.