करवीर : सांगरूळ येथील सौरभ खाडे सेट परीक्षेत उतीर्ण

सावरवाडी प्रतिनिधी :
करवीर तालुक्यातील सांगरूळ येथील सौरभ तुकाराम खाडे हे अवघ्या वयाच्या 23 वर्षी सेट परीक्षेत उतीर्ण झाले आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठ यांचे वतीने घेण्यात आलेल्या भौतिकशास्त्र विषयात एम एस्सी शिक्षण पूर्ण केले आहे. व पहिल्याच प्रयत्नात सेट परीक्षेत घवघवीत यश मिळवून यूवा पिढीला एक आदर्श घालून दिला आहे… करवीर तालूक्यातून पहिल्याच प्रयत्नात सेट परीक्षेत उतीर्ण होणारा सौरभ खाडे हे पहिलेच आहेत.
सौरभचे वडील तुकाराम खाडे हे माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत, तर आई सावित्री खाडे या गृहिणी आहेत..आई वडिलांचा आशिर्वाद व त्यांच्या पाठींब्यामूळेच मी आज यशस्वी झाल्याचं सौरभ खाडेनी सांगितल..एका सामान्य कूटूंबातील असून त्याने मोठ्या चिकाटीने यश प्राप्त केले आहे . या बद्दल सांगरूळ पंचक्रोशीतून सौरभ खाडे यांचे कौतुक होत आहे.