ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर जिल्ह्याला पुढील दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट

आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असुन जिल्ह्याला हवामान विभागाकडुन आज व पुढील दोन दिवसांचा दि.26,27 जुलै ऑरेंज अर्लट व दि.28,29 जुलै साठी येलो अलर्ट जाहीर केला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली असल्याने राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे लवकरच उघडण्याच्या स्थितीत आहे. सध्याच्या घडीला राधानगरी धरण 95.56% भरले आहे. धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरुच आहे.