महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसनसो मुश्रीफ यांचे वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्याचे लाडके आमदार, महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसनसो मुश्रीफ साहेब यांचे वाढदिवसानिमित्त प्र.क. २ (अ/ब) श्री. जयसिंगराव पार्क व श्रमिक वसाहत मधील नागरिकांच्या साठी तसेच कागल शहर व परिसरातील नागरिकांच्या साठी “अथायू हॉस्पिटल” यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबीर रविवार दि.१३/०४/२०२३ रोजी सकाळी ९ ते दु. २ या वेळेत आयोजित केले आहे. तरी याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा व शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिबिराचे आयोजक कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष व या प्रभागाचे नगरसेवक नितीन कल्लापा दिंडे (मा. उपनगराध्यक्ष) यांनी केले आहे.
या आरोग्य शिबीराचे उदघाटन नाम. हसनसो मुश्रीफ यांचे शुभ हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.यावेळी अजित इंगळे, राजेंद्रे केरले, लियाकत मकानदार, विजय डोणे, फिरोज कडगी, राजेंद्र डोंगरे, सुयोग शिंदे, चेतन घाटगे, नितीन जमनिक इ. प्रमुख मान्यवर उपस्थित होते.