मुरगूड मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक उत्साहात साजरा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
स्वराज्याचे धाकले धनी महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन मुरगूड शहरातील शिवतीर्थ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यंदाचे मुरगुड येथील शंभूराज्याभिषेकचे हे दुसरे वर्ष यावर्षी सदाशिवराव मंडलिक संस्कार भवन चे विद्यार्थी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनबोध गाडगीळ आणि महादेव वाघवेकर यांनी या संपूर्ण सोहळ्याचे पौराहीत्य केले मुरगुड येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते तानाजी भराडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस पंचामृत दुग्धाभिषेक घालून राज्याभिषेक संपन्न करण्यात आला यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी शिवभक्त संकेत भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले ध्येयमंत्र आणि प्रेरणा मंत्र यांनी या कार्यक्रमाचा शेवट झाला यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची गारद झाली या राज्याभिषेकामुळे संपूर्ण वातावरण शंभूमय झाले होते. यानंतर लहान मुलांना लाडू वाटप करण्यात आले.
यावेळी शिवभक्त सर्जेराव भाट, संकेत शहा, ओंकार पोतदार, जगदीश गुरव, सुनील घाटगे, प्रसाद गोंधळी, प्रशांत सिद्धेश्वर,सदाशिवराव मंडलिक संस्कार भवन मुरगुड मुख्याध्यापिका योगिनी शेट्टी, शिक्षीका गीता ढेरे , वैशाली वनभटटे , सोनाली वडर , गणेश भाट, विजय मोरबाळे, प्रथमेश भाट,सागर भाट, प्रकाश पारिशवाड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.