ताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऊस शेती आळशी असेल तर तुमच्या नातवांचे १२ साखर कारखाने कसे ? राजू शेट्टींचा शरद पवारांना सवाल

शिरोळ प्रतिनिधी :

ऊस हे तसे आळशी माणसांचे पीक आहे. त्यामुळे फक्त ऊस घेण्याएवेजी थोडा कापूस, सोयाबीन आणि फळबागा अशी पीक पद्धती ठेवा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी फेसबूक पाेस्‍टच्‍या माध्‍यमातून टीकेचा आसूड ओढला आहे.ऊस शेती आळशी असेल तर तुमच्या नातवांचे १२ साखर कारखाने कसे? असा सवालही त्‍यांनी उपस्थित केला आहे. याचबरोबर ऊस शेती करताना शेतकऱ्याला किती काबाड कष्ट करावे लागते याचे गणित मांडत फेसबुक पोस्ट लिहत शरद पवार यांना उत्तर दिले आहे

या आळश्यांच्या जिवावर जिल्हा बँकेचे चेअरमन संचालक, कारखान्याचे संचालक चेअरमन यासारखी बांडगुळ पोसुन VSI सारखा पांढरा हत्ती सांभाळणे.

२) या आळशांनी पै-पै (FRP) गोळा करुन उभारलेला सहकारी तत्वावरचा कारखाना मोडून खाणे.

३) एफआरपी चे शक्य तेवढे तुकडे करुन या आळशांना देशोधडीला लावणे.

४) कारखाना परिसरातील ऊस शिल्लक ठेवून कारखाना गाळप बंद करणे, काटा मारणे , उता-यात फेरफार करणे.

५) एकरकमी एफआरपी (FRP) देणा-या कारखान्याच्या कार्यक्रमात जाऊन एफआरपी दोन टप्प्यात द्यावी लागेल. अशी खंत व्यक्त करणे.

पवार साहेब, या उपाय योजना आंमलात आणुन ऊस उत्पादकाला लवकरात लवकर धडा शिकवावा, अशी उपराेधिक टीकाही राजू शेट्टी यांनी केली आहे.

साखर संघाचे अध्यक्ष शरद पवार आणि उसाचे दर हेच ठरवणार. सगळ्यात जास्त कारखाने यांच्या ताब्यात. शेतकरी आळशी आहे, तुम्ही शहाणी माणसे आहात. त्यामुळे तुम्ही आमच्यावर सत्ता गाजवत आहात. तुमचा रोहित लई शहाणा निघाला. तो मताची शेती करतो. कन्‍नड साखर कारखाना घशात घालून तो अती कष्टाळू झाला आहे. शरद पवार कुटुंबीयांनी 23 कारखाने घशात घातले आहेत, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. एफआरपी व दिवसा विजेसाठी सरकारला गुडघे टेकायला लावू, असेही ते म्हणाले. नांदणी (ता. शिरोळ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हुंकार यात्रा व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जयकुमार कोले होते. शेट्टी म्हणाले, दिवसा शेतीसाठी वीज मिळावी ही आमची रास्त मागणी आहे. यासाठी कोर्टात जाणार आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाईने शेतकरी भरडला जात आहे.तुम्हाला कारखान्याची एवढी चिंता आहे, तर शिल्लक साखरेवर नाबार्ड कडून थेट कर्जपुरवठ्यासाठी प्रयत्न केलात तर शेतकरी सुखी होईल.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks