ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कुर येथील अमित कांबळे याची JEE ADVANCE मधून आय.आय.टी (IIT) कांचीपुरम येथे निवड

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कुर (ता.भुदरगड) येथील कु.अमित अनिल कांबळे याची JEE ADVANCE मधुन आय.आय.टी (IIT) कांचिपुरम येथे निवड झाली आहे. त्याला जवाहर नवोदय विद्यालयचे शिक्षक एम. डी.आलम, प्राचार्य डी.रवि. दामोदरन यांचे मार्गदर्शन मिळाले तर वडील अनिल कांबळे व आई रेश्मा कांबळे यांचे प्रोत्साहन लाभले.