केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्यावतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत स्वप्निल मानेंचे उत्तूंग यश

बामणी प्रतिनिधी :
सिद्धनेर्ली गावचे सुपुत्र स्वप्निल तुकाराम माने यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्यावतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत उत्तूंग यश मिळवल्याबद्दल त्यांचा बामणी येथे पुष्पहार, पुष्पगुच्छ,शाल श्रीफळ व संविधान देऊन असा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे गावातुन स्वप्नील माने यांची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी गोकुळचे संचालक अमरिश घाटगे यांनी मिरवणुक दरम्यान त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. भिमराव शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले .यावेळी स्वप्नील माने यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांना मार्गदर्शन केले,
यावेळी गावचे सरपंच रावसाहेब पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य , तसेच गावातील विविध संस्था चे पदाधिकारी , सर्व समाज बांधव सर्व तरुण मंडळे उपस्थित होती.तसेच हसुरचे युवराज पोवार ,कागल बँकेचे चेअरमन एम.पी .पाटील , शिवाजी मगदुम , शिवाजी मगदुम, दत्तात्रय माने , सुशिला माने, युवराज कोईगडे,पिंटु पाटील, नारायण टेलर, संजय मगदुम प्रकाश पाटील , तुकाराम बोडके ,रवि मगदुम ,कोगले सर उपस्थित होते.
तर तुळशीदास माने , साताप्पा पाटील, आण्णाप्पा शिंदे ,रवि शिंदे, अशोक शिंदे, यशवंत शिंदे, शिवाजी शिंदे,अभि शिंदे, सुनील माने, अशोक माने , शक्ती माने,पिटु फडतारे , संभाजी जाधव, पांडुरंग जाधव सहकुटुंब उपस्थित राहुन तसेच बामणी गावचे पोलिस पाटील ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व अधिकारी पदाधिकारी उपस्थित राहुन मा.स्वप्नील माने साहेब यांच्या सत्कार सोहळ्याची शोभा वाढवली.