मुरगूडच्या राज्यस्तरीय मॅराथॉन स्पर्धेत बोरवडेचा इंद्रजीत फराकटे प्रथम

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथील विश्वनाथराव पाटील कला क्रीडा मंडळ संचलित लाल आखाडा यांच्या वतीने कै.श्री.अजितसिह पाटील यांच्या स्मृती प्रत्यार्थ घेण्यात आलेल्या राज्य स्तरीय अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत 1600 मीटर पुरुष खुला गटात प्रथम क्रमांक इंद्रजीत फराकटे (बोरवडे ), द्वितीय क्रमांक प्रवीण गडकरी संकेश्वर, तृतीय क्रमांक ओंकार कुंभार इचलकरंजी, चतुर्थ क्रमांक सुहास सारवसकर मळगे यांनी पटकावले
स्पर्धेचा अन्य निकाल असाः
1600 मीटर महिला खुला गट :प्रथम क्रमांक सृष्टी रेडकर नेसरी द्वितीय क्रमांक पूर्वा शेवाळे टाकवडे तृतीय क्रमांकभक्ती पोटे गडहिंग्लज चतुर्थ क्रमांक वैष्णवी रावळ निपाणी पाचवा क्रमांक वैष्णवी कागले टाकवडे
1600 मीटर पंचक्रोशी खुला गट
प्रथम क्रमांक अविनाश पाटील कुरणी, द्वितीय क्रमांक निसर्ग तोरसे वाघापूर,
तृतीय क्रमांकओंकार एकल वाघापूर, चतुर्थ क्रमांक रोहित खोराटे बेलवळे.
3 कि.मी पुरुष
प्रथम क्रमांककेशव पन्हाळकर, द्वितीय क्रमांकहर्षद कदम,
तृतीय क्रमांक दत्ता मुंबे, चतुर्थ क्रमांक साहिल बंदारे, पाचवा क्रमांक सौरभ कुंभार.
4×400रिले पुरुषप्रथम क्रमांक
Wrsf बिद्री द्वितीय क्रमांक शिवशक्ती अनुर तृतीय क्रमांक युवा अकॅडमी वाळवे
चतुर्थ क्रमांक प्रॅक्टिस क्लब वाळवे.
या मॅराथॉन स्पर्धेचा शुभारंभ निशाण दाखवून ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी केला. तर फोटो पुजन बिद्री कारखान्याचे कार्यकारी संचालक किशन चौगले यांच्या हस्ते पार पडले . बक्षीस वितरण युवा नेते दिग्विजयसिंह पाटील, सत्यजितसिंह पाटील, यांच्या हस्ते झाले यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, बिद्री शितल फराकटे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, दगडू शेणवी, संजय मोरबाळे,अॅड सुधीर सावर्डेकर, राजू आमते उपस्थित होते.
स्वागत सत्यजित पाटील यांनी तर सूत्रसंचालन राजू चव्हाण,तर आभार सुशांत महाजन यांनी केले.
स्पर्धेचे आयोजन पांडुरंग पुजारी, राजू चव्हाण, गणेश तोडकर, शिवाजी मोरबाळे, रोहीत मोरबाळे, सुहास शेणवी संदिप सारंग आदीनी केले.