नामदार मुश्रीफ साहेब आपणास मानाचा मुजरा : राष्ट्रीय पंच बट्टू जाधव यानी मानले सर्व पैलवान, वस्ताद यांच्या वतीने आभार

मुरगूड प्रतिनिधी :
हजारो कुस्ती शौकीनांच्या साक्षीने गेल्यावर्षी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान रवी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात आपण बानगे (ता. कागल) येथे न भूतो न भविष्यती असे कुस्ती संकुल उभा करतो म्हणून शब्द दिला होता आणि परवाच कुस्ती संकुलासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्याबद्दल तमाम महाराष्ट्रातील मल्लांच्या वतीने आपणास मानाचा मुजरा..!
दिलेला शब्द पाळणारे नेते म्हणून आपली उभ्या महाराष्ट्राला ओळख आहे आणि तो आपण खरा केलात. साहेब कुस्तीवरील आपले प्रेम निस्सीम आहे. बर्याच वेळा आम्हाला त्याचा अनुभव आला आहे. या अगोदरसुध्दा बर्याच वर्षापूर्वी बानगे येथे पैलवान रवी पाटील यांनी मैदान घेतले होते या मैदानाला सुध्दा आपण अधिवेशन सुरु असतानाही तेथून थोडा वेळ काढून सरळ हेलिकॅप्टर घेऊन मैदानात हजेरी लावली. आपण खेळात कधीच राजकारण आणले नाही.
गेल्याच वर्षी मी निवेदन करत असताना आपणास कागल तालुक्यात एक भव्य दिव्य कुस्ती संकुल व्हावे अशी अपेक्षा केली होती आणि बानगे गावात अत्याधुनिक भारतातील सर्वात मोठे कुस्ती संकुल उभा राहत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. छत्रपती शाहूंचा वसा आणि वारसा चालवण्याचे काम आपण करत आहात. तमाम महाराष्ट्रातील पैलवानांची छाती आज अभिमानाने फुलली तसेच या कुस्ती संकुलासाठी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान रवी पाटील आणि त्यांचे बंधू यांनी कोट्यवधी रुपयांची आपली जमिन संकुलासाठी देऊन आपले कुस्तीवरील प्रेम उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले. त्यांनाही तमाम महाराष्ट्रातील पैलवान यांच्याकडून मानाचा मुजरा.
या नामदार हसन मुश्रीफ आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन मधून आपल्या आणि पैलवान रवी पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय पैलवान तयार व्हावे हीच ईश्वरचरणी आणि लाल मातीच्या चरणी प्रार्थना..!
– पैलवान बट्टू जाधव (कुस्ती पंच, निवेदक कोल्हापूर)