सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता.कागल येथील सदाशिव मंडलिक महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती इतिहास विभागामार्फत उत्साहात साजरी करण्यात आली. . सुरुवातीस इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक पी आर फराकटे यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अर्जुन कुंभार होते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर अर्जुन कुंभार व प्राध्यापक एम आर बेनके यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य म्हणाले की, संपूर्ण जगात आदर्शवत ठरलेल्या छत्रपती शिवरायांना राजमाता जिजाऊ यांनी घडवले त्यांना स्वातंत्र्याची प्रेरणा दिली त्याचबरोबर संपूर्ण जगाला आपल्या ज्ञानाने दिपवून टाकणाऱ्या स्वामी विवेकानंद यांनी युवकांना, उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका, असा संदेश दिला. यावेळी कार्यक्रमास प्राध्यापक डॉक्टर शिवाजी होडगे, अभिनंदन प्राध्यापक डॉक्टर शिवाजी पोवार, प्राध्यापक एमआर बेनके, प्राध्यापक गोरे, प्राध्यापक कुमारी माने, प्राध्यापक कुमारी पाटील, प्राध्यापक माधव कर, प्राध्यापक डॉक्टर युअर शिंदे , प्राध्यापक डॉक्टर ऍडी जोशी, राजेंद्र मंडलिक दिलीप कांबळे सुमित जाधव सदा शिवगिरि त्याचबरोबर विद्यार्थी सर्व प्राध्यापक उपस्थित होते आभार प्राध्यापक जयसिंग कांबळे यांनी मानले.