मुरगूडमध्ये भाट समाजाच्या वतीने हनुमान जयंती उत्साहात साजरी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथे श्री पूजक भाट समाजाच्या वतीने हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ५.३० वाजता हनुमान मूर्तीला वैदिक मंत्रोच्चारात अभिषेक व पूजन करण्यात आले. हे पूजन दीपक बहुधान्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
ठीक सकाळी ६.२४ वाजता हनुमान जन्मकाळ साधून, पूर्वेकडील सूर्योदयाच्या लालिमेत श्रींच्या पाळण्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. महिला भक्तांनी पारंपरिक पद्धतीने पाळणा गीत गायले. फटाक्यांची आतषबाजी करत संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. यानंतर सर्वांना प्रसाद व सुंटवडा वाटप करण्यात आले.
भाट समाजाकडून गेली सत्तर वर्षे हनुमान जयंतीची परंपरा सातत्याने पाळली जात आहे. समाजाच्या पूर्वजांनी तीर्थक्षेत्र काशी येथून संगमरवरी मूर्ती आणून बाजारपेठेतील सध्याच्या राणाप्रताप चौकात मंदिर स्थापन केले आहे. हे मंदिर साध्या स्वरूपाचे असले तरी ते जागरूक व भक्तिभावपूर्ण ठिकाण असल्याचे लक्ष्मण भाट यांनी सांगितले. यंदाच्या जयंतीनिमित्त एक हजार भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास भाट समाजातील लक्ष्मण भाट नारायण भाट, भरत भाट, जनार्दन भाट, जालिंदर भाट गोपी भाट, नामदेव भाट, शिवाजी भाट, यशवंत भाट, राजू भाट किरण भाट पोलीस पाटील सुरज भाट रोहन भाट रोहित भाट रुपेश भाट सुशांत भाट प्रशांत भाट सागर भाट आकाश भाट ओंकार भाट वैभव भाट प्रथमेश भाट गणेश भाट व इतर अनेक भाविक उपस्थित यावेळी आभार सर्जेराव भाट यांनी मांडले.