संविधान दिनानिमित्त ‘आप’चा निर्धार! संविधानाची मूल्ये गावोगावी पोहचवणार : संदीप देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
संविधान दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान वाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बिंदू चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधान वाचन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये संविधानाच्या मूल्यांचा प्रचार-प्रसार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी बिंदू चौक येथे जमून संविधान वाचन केले. यासोबतच 26/11 च्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, उत्तम पाटील, अमरजा पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, आदम शेख, अभिजित भोसले, मयूर भोसले, पल्लवी पाटील, विजय हेगडे, भाग्यवंत डाफळे, शशिकांत पाटील, सुधाकर शिंदे, संजय सूर्यवंशी, मंगेश मोहिते, प्रथमेश सूर्यवंशी, बसवराज हदीमनी, किशोर खाडे, गणेश वडर आदी उपस्थित होते.