ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात यश : कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर

आज सकाळी साडे नऊ च्या दरम्यान राधानगरी धरणाच्या गेटच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना अपघाताने सर्व्हिस गेट ओपन झाले होते. यामुळे पंचगंगा नदीपात्राची पाणी पातळी वाढत होती. नदीकाठच्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला होता.

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात आज दुपारी 3.15 च्या दरम्यान जलसंपदा विभागाला यश आले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता (कोल्हापूर) रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे.

आज सकाळी साडे नऊ च्या दरम्यान राधानगरी धरणाच्या गेटच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना अपघाताने सर्व्हिस गेट ओपन झाले होते. यामुळे पंचगंगा नदीपात्राची पाणी पातळी वाढत होती. नदीकाठच्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला होता.

जलसंपदा विभागाच्या अथक परिश्रमानंतर राधानगरी धरणाचा दरवाजा बंद करण्यात आला आहे.. कोल्हापूरकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks