ताज्या बातम्यामहाराष्ट्र
बोरवडे येथे विद्यार्थ्याची गळपास घेऊन आत्महत्या

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
बोरवडे (ता. कागल) येथील ऋषीकेश नितीन साठे (वय १६) या विद्यार्थ्याने राहत्या घरी तुळईला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. दहावीच्या परीक्षेत गुण कमी पडल्याच्या कारणावरून त्याने ही आत्महत्या केली आहे. याबाबतची वर्दी चुलते बाजीराव शिवाजी साठे यांनी मुरगूड पोलिसांत दिली असून, या घटनेची ऋषीकेश साठे नोंद मुरगूड पोलिसांत झाली आहे.
मंगळवार, दि. १३ रोजी ऑनलाईन निकाल कळल्यानंतर ऋषीकेशला दहावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा खूपच कमी गुण मिळाले. यामुळे त्याने रात्री ७.४५ च्या सुमारास घरी कुणीही नसल्याचे पाहून माळ्यावर नॉयलॉन दोरीने लाकडी तुळईला गळफास लावून घेतला. त्यास उपचारासाठी मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले. अधिक तपास मुरगूड पोलीस करत आहेत.