ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणेश विसर्जन मिरवणूक व कोरोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त ठेवणार : एपीआय विकास बडवे

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

गणेशोत्सव मिरवणूकीच्या काळात शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुरगूड पोलिसांच्या वतिने कडक बंदोबस्त ठेवणेत येणार आहे . तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशांचे पालन करणेसाठी मुरगूड पोलिस स्टेशनचे वतिने नियमांची कडक अंमल बजावणी केली जाणार आहे . याचाच एक भाग म्हणून एपीआय विकास बडवे यांचे मार्गदर्शना खाली शहरातून संचलन करणेत आले.

यावेळी भव्यप्रमाणात डॉल्बी लावून मोठ्या गर्दीने मिरवणूक न काढणे , मोठ्या संख्येने लोक एकत्र न जमा होणे , कोरोना प्रतिबंधासाठी सोशल डिस्टंसिंग पाळणे, सॅनिटायजरचा वापर करणे, मास्कचा वापर करणे आदी नियमांचे पालन करण्यासाठी तसेच शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी मुरगूड मधील नागरिकांना संचलनावेळी माईकवरून आवाहन करण्यात आले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks