आल्याचीवाडी येथील खून प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई व्हावी; परीट समाजाचे पोलीस निरीक्षकांना निवेदन

चंदगड : संदीप देवण
आठवड्यापूर्वी आजरा तालुक्यातील पश्चिम भागात असणाऱ्या आल्याचीवाडी येथील लता परीट (वय 45) या महिलेचा मृत्यदेह उसाचा शेतात आढळला होता. वादातून किंवा इतर कारणवरून महिलेचा खून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.त्या अनुषंगाने आरोपीला अटक झाली. अटक झालेल्या आरोपीला कडक शिक्षा द्यावी अशी विनंती परीट समाज्यामार्फत करण्यात आली. या आशयाचं निवेदन परीट समाज्याच्या वतीने आजरा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुनील हारगुडे यांना देण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा परीट समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष पंकजदादा पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र परीट,जिल्हा संचालक शशिकांत परीट,नगरसेवक – उदय परीट,जिल्हा सल्लागार दशरथ यादव, अशोक शिंदे ,गडहिंग्लज तालुका अध्यक्ष रामचंद्र परीट, चंदगड तालुका अध्यक्ष मनोज परीट,आजरा तालुका अध्यक्ष भिकाजी परीट,उपाध्यक्ष शिवाजी परीट, विलास परीट,बाबुराव परीट सर, शिवाजी परीट,दयानंद परीट,अशोक भालेकर,संजय भालेकर,बाळू बांदेकर,राजू परीट,परीट मामा व इतर परीट समाज बांधव उपस्थित होते.