राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयास दिली भेट ; हेल्पलाईन 112 क्रमांक चा स्वतः घेतला आढावा

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
कोल्हापुर दौऱ्यादरम्यान असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेऊन कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे भेट दिली.कोल्हापूर येथे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासोबत बैठक घेतली
कंट्रोल रूम मध्ये भेट दिली असता , रूपालीताई चाकणकर यांनी स्वतः हेल्पलाईन क्रमांक 112 वर संपर्क केल्याच्या नंतर चार मिनिटांत पोलिसांच्या कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. चौदाव्या मिनिटांमध्ये पोलीस यंत्रणा सांगितलेल्या ठिकाणी मदतीसाठी पोहचली. महाराष्ट्रातील कोणत्याही भागातून महिला भगिनींना मदत हवीअसल्यास,विद्यार्थ्यांनी,युवती ,नोकरदार महिला यांना आपल्या सुरक्षिततेसाठी मदत हवी असल्यास आपण तात्काळ 112 या क्रमांकाशी संपर्क साधा,पोलिस यंञणा आपल्या सुरक्षिततेसाठी दाखल होईल. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस सुसज्ज आहे असा विश्वास रूपालीताई चाकणकर यांनी व्यक्त केला.
112 या पोलीस हेल्पलाईन फोन क्रमांकावरून अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे.कोल्हापूर पोलीस नागरिकांच्या सेवेसाठी गांभीर्यपूर्व कार्यरत आहे याचं समाधान महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी बोलताना व्यक्त केले.