ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धत जान्हवी सावर्डेकरने पटकावली चार सुवर्णपदके; राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

औरंगाबाद येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोशिएशनच्या सब-ज्युनियर, ज्युनियर , सिनियर व मास्टर्स I ते IV (पुरुष व महिला) बेंचप्रेस (इक्विण्ड अण्ड अनइक्विण्ड) अजिंक्यपद स्पर्धत येथील जान्हवी जगदीश सावर्डेकर हिने तब्बल ४ सुवर्णपदके पटकावली आहेत .तिची गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धसाठी निवड झाली आहे .

महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोशिएशन महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर, ज्युनियर , सिनियर व मास्टर्स I ते IV (पुरुष व महिला) बेंचप्रेस (इक्विण्ड अण्ड अनइक्विण्ड)अजिंक्यपद स्पर्धा औरंगाबाद येथे ९ व १० ऑक्टोंम्बर २०२१ रोजी झाली . त्यामध्ये जान्हवी सावर्डेकर हिने ७६ किलो वजनी गटात इन इक्युब प्रकारात ७५ किलो वजन उचलुन सिनियर व ज्युनियर गटात दोन सुवर्णपदके तर इक्यूब प्रकारात १०५ किलो वजन उचलुन सिनियर व ज्युनियर गटात दोन सुवर्णपदके अशी चार सुवर्णपदके पटकावली असून तिची राष्ट्रीय
पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धसाठी निवड झाली आहे .

जान्हवी सावर्डेकर हिने यापुर्वी महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धत ज्युनियर गटात गोल्ड मेडल तर सिनीयर गटात सिल्व्हर मेडल पटकावले . तसेच अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पॉवरलिफ्टींग अजिक्यपद स्पर्धत ७९ किलो वजन गटात रौप्यपदकासह राष्ट्रीय व राज्य स्पर्धत ७ सुवर्ण, ५ रोप्य व २ कांस्यपदके पटकावली आहेत .तिला प्रशिक्षक विजय कांबळे यांचे मार्गदर्शन तर वडील जगदीश सावर्डेकर यांचे प्रोत्साहन लाभले .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks