ताज्या बातम्या

नागणवाडी परिसरात भात रोपलागवडीला प्रारंभ

नागणवाडी : मष्णू पाटील 

तालुक्यात सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी भात रोपलागवडीला सुरवात झाली आहे .यामुळे शिवारे शेतकऱ्यांनी गजबजून गेली असून , पावसाची प्रतीक्षा करण्यात येत आहे .काही ठिकाणी रोप लागवडीसाठी विहीरीच्या पाण्याचा वापर करण्यात येत आहे.

तालुक्यात मागील दोन आठवड्यापासून पावसाने पाठ फिरवली आहे . यामुळे शिवारातील पाणी काही प्रमाणात कमी झाले आहे. परिणामी रोपलागवडीसाठी पाण्याची व्यवस्था करताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.काही ठिकाणी विहिरीतील पाणी शेतात सोडून रोपलागवडीसाठी चिखल करण्यात येत आहे .

जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली.पहिल्याच पावसात नदी, नाले तुडूंब भरून गेले.शिवारे जलमय बनली.

भातलावणीला भागात चिखल करण्यासाठी सध्या बैलजोडीचा वापर दुर्मिळ झाला असून जा जागी पॉवर ट्रेलरचा वापर होत असल्याच शिवारात दिसून येत आहे पण सध्या पावसाने दडी मारल्यामुळे विहिरीतील पाणी शेतात सोडून रोपलागवडीसाठी चिखल करण्यात येत आहे .

पावसाची प्रतीक्षा

सध्या भात रोपलागवड सुरू असली तरी पावसाच्या हजेरी नंतर रोप लागवडीला वेग येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पावसाची प्रतीक्षा करण्यात येत आहे .सध्या पाण्याची सोय असणाऱ्या शिवारातून रोपलागवड करण्यात येत आहे. मोटारींच्या माध्यमातून पाण्याची सोय करण्यात येत असून रोपलागवडीसाठी पावसाची आवश्यकता आहे . पावसाअभावी शेतकरी हतबल बनले आहेत .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks