ताज्या बातम्यामहाराष्ट्र

करवीर तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन पिकांच्या काढणीला प्रारंभ

सावरवाडी प्रतिनिधी :

खरीप हंगामा  पिकांतंर्गत जून महिन्यात पेरणी केलेल्या भुईमुग,सोयाबीन  पिकांच्या काढणीच्या कामांना करवीर तालुक्यात प्रारंभ झाला आहे . मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे भुईमुग पिकांच्या काढणीस वेग येऊ लागला आहे . मात्र हवामानाच्या परिणामामुळे सोयाबीन ,भूईमुग पिकांच्या  उत्पादनात घट झाली आहे. 

गेल्या पंधरा दिवसापासुन करवीर तालुक्यात खरीप हंगामातील भुईमुग , सोयाबीन , या पिकांच्या काढणीच्या कामांची सर्वत्र धांदल उडाली आहे सोयाबीन पिकाचे  यंदा चांगले उत्पादन मिळू लागले आहे . शेतीमध्ये सोयाबीन पिकाची काढणी व यंत्राद्वारे मळणी करण्याच्या कामांना धांदल उडू लागली आहे . मात्र ऐन सुगीच्या काळात सोयाबीन पिकाचे भाव अकरा हजार वरून चार हजार वर आल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर बनला आहे. 

वाढत्या महागाईच्या काळात शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या आधारे दर मिळत नाही . त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे . काढणी केलेल्या सोयाबिन पीकाची विक्री ही दर कोसळल्याने शेतकऱ्यांनी थांबविले आहे . ऐन सुगीच्या तोंडावर सोयाबिनचे दर कोसल्याने शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसला आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks