कोल्हापूर जिल्ह्यातील फिरते लोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर :
मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे आदेशानुसार आणि मा.व्ही.व्ही.जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे मार्गदर्शनाखाली तसेच मा.श्री.पंकज देशपांडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे सुचनेनुसार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ ते १८ डिसेंबर २०२१ पर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये फिरते लोक अदालतीलाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील प्रलंबित दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रकरणे आणि दाखल पूर्व प्रकरणे तडजोडी करीता ठेवणेत आली होती. दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ ते १८ डिसेंबर २०२१ मधील कालावधी मध्ये दिवाणी प्रकरणे ४३६ पैकी ४५ निकाली काढण्यात आली.फौजदारी प्रकरणे ३१७ पैकी ४७ निकाली काढण्यात आली. आणि दाखलपूर्व प्रकरणे १०५७ पैकी १९१ निकाली काढण्यात आली होती असे एकूण १८०९ प्रकरणां पैकी २८३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि रक्कम रुपये ३९४९५८७४ इतकी वसूल करण्यात कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने फिरते लोक अदालतीस यशस्वीपणे पार पाडले. या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील आणि तालुक्यातील सर्व न्यायिक अधिकारी, कर्मचारी, विधीज्ञ, पक्षकार यांचे सहकार्य लाभले होते.