बरगेवाडी येथे आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडूत्री प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे पूर ओसरला की साथीचा रोगाचा फैलाव होत असतो याचीच दखल घेत राधानगरी विधानसभा मतदार संघात पूर बाधित गावांमध्ये सुशिलादेवी आनंदराव आबिटकर हेल्थ फाउंडेशन व अमेरीकेअस इंडिया हेल्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
पूरग्रस्त भागात हा उपक्रम कौतुकास्पद आहे असे उद्गार आनंदा राऊ बरगे यांनी शिबिरात बोलताना काढले
या शिबिरासाठी डॉक्टर गौरव महंत, वृषाली नाईक, संग्राम कांबळे, प्रभुणे पवार व सर्व स्टॉप यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रणजितसिंह आबिटकर, ऋषिकेश जाधव, कृषी आत्मा राधानगरी समितीचे सदस्य बाळासाहेब बरगे,माजी उपसरपंच सुभाष बरगे, धनाजी बरगे, ग्रामसेवक सुरेश ढेरे तसेच गावातील पदाधिकारी उपस्थित होते.
प्रास्ताविक बाळासो बरगे यांनी तर आभार नामदेव बरगे यांनी मांनले.