मुरगूड मध्ये रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; महिलांचा सहभाग कौतुकास पात्र

मुरगूड :
लोकमतच्या महारक्तदान मोहिमेअंतर्गत रविवारी मुरगूड शहरात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी महिलांनी ही रक्तदान करत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.यावेळी मान्यवरांच्या हस्ते तुळसी रोपाला पाणी घालून या शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

या शिबिराचे उदघाटन माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील,सहा पोलीस निरीक्षक विकास बडवे,सहा पोलीस उपनिरीक्षक किशोर खाडे, सहा पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे,गट शिक्षणाधिकारी डॉ गणपतराव कमळकर,बिद्री संचालक दत्तामामा खराडे,शाहू कृषी संघाचे अध्यक्ष अनंत फर्नाडिस,दिग्विजय पाटील,प्राचार्य जीवन साळोखे,उपनगराध्यक्ष रेखाताई मांगले,हेमलता लोकरे,प्राचार्य एस.आर.पाटील,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष रणजित सूर्यवंशी,राहुल वंडकर,पक्ष प्रतोद संदीप कलकूटकी,सुधीर सावर्डेकर,सुशांत मांगोरे,दगडू शेणवी आदी च्या हस्ते झाले.
यावेळी प्रविणसिंह पाटील म्हणाले लोकमत ने आयोजित केलेला उपक्रम चांगला आहे.लोकमत नेहमीच लोकांच्या हिताचा विचार करते.त्यामुळे घराघरात लोकमत पोहचला आहे असे ही सांगितले.तर प्राचार्य जीवन साळोखे यांनी प्रास्ताविकात लोकमतच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेऊन महारक्तदान मोहिमेची व्याप्ती व सद्यस्थितीतील महत्त्व विशद केले.स्वागत लोकमतचे मुरगूड प्रतिनिधी अनिल पाटील यांनी केले.आभार दीपक शेणवी यांनी मानले.सूत्रसंचालन एम बी टेपुगडे यांनी केले.
यावेळी सहा व्यवस्थापक महावीर विभूते, नगराध्यक्ष किरण गवाणकर,नगरसेवक सुहास खराडे,नगरसेवक मारुती कांबळे,संजय गांधी समिती सदस्य राजू आमते,शिवाजी सातवेकर,नामदेव भांदिगरे,जगन्नाथ पुजारी,संजय मोरबाळे,राजू भाट,विठ्ठल भोसले,स्वप्नील मोरे,अमर चौगले,अनिल राऊत,खाशाबा भोसले,अमर देवळे,विजय पाटील,कुरणी चे सरपंच निवास पाटील ,रघुनाथ भारमल,तुकाराम पाटील,रवी परीट,राजू चव्हाण,आदी प्रमुख उपस्थिती होते.
महिलांची आघाडी
या शिबिरात माजी उपनगराध्यक्षा हेमलता लोकरे,नगरसेविका सुप्रिया भाट, क्रांती विक्रांत भोपळे, यांनी रक्तदान करत शिबिराची सुरवात केली.भाट यांनी आपला मुलगा प्रथमेश यांच्यासहित रक्तदान केले.तर विरोधी पक्ष नेता राहुल वंडकर आणि पालिका पक्ष प्रतोद संदीप कलकूटकी यांनी ही रक्तदान केले
तरुणांचे सहकार्य
शिबिर पार पाडण्यासाठी मोहन गुजर,दीपक शेणवी,वैभव अर्जुने, हर्षवर्धन मोरबाळे, विजय मोरबाळे, डॅन डेळेकर,स्वराज्य निर्माण संस्था,शहरातील सर्व आदींनी सहकार्य केले.तर पोलीस कर्मचाऱ्यांनी अल्पोपहार,सानिका फौंडेशन ने मास्क तर राष्ट्रवादी पक्षाकडून ज्यूस वितरीत करण्यात आले.
विसावे रक्तदान
येथील महा विकास सेतू केंद्राचे प्रमुख गौरव मोर्चे यांनी विसाव्या वेळी रक्तदान केले तर कुरणी चे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पाटील यांनी आपल्या वाढ दिवसानिमित आपल्या मित्रा सोबत रक्तदान केले.