कोळिंद्रे येथील प्रदीप पाटील या तरुणाचे दुर्दैवी निधन

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
कोळिंद्रे तालुका आजरा येथील प्रदीप बाळकृष्ण पाटील वय 19 वर्ष या तरुणांचा ट्रॅक्टर ट्रेलर खाली सापडून दुर्दैवी अंत झाला या बाबत अधिक माहिती अशी की प्रदीप पाटील हे वनविभागाची ठेकेदाराने तोडलेली लाकडे चिंचेवाडी सामानगड येथून आणून येमेकोंड येथे वनविभाग डेपोला सोडणेसाठी ट्रॅक्टर घेऊन गेले होते मात्र सकाळी पावणे आठ च्या सुमारास ट्रॅक्टर स्लिप होऊन ट्रेलर पलटी झाला या ट्रेलर खाली सापडून त्याचा दुर्दैवी अंत झाला त्याच्या निधनाने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे प्रदीप हा अत्यन्त मनमिळावू व सध्या स्वभावाचा होता गावात सर्वांची कामे तो करत होता त्याचे शिक्षण 10 वी पर्येंत झाले होते यानंतर त्याने आय टी आय चा इलेक्ट्रिशियन चा कोर्स केला होता लॉकडाउन मुळे तो सध्या मिळेल ती कामे करीत होता त्याच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे सायंकाळी साडे सहा च्या सुमारास त्याच्यावर गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले यावेळी मोठी गर्दी झाली होती अधिक माहितीसाठी गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे सदर बिटचे पोलीस यांचेशी सम्पर्क साधनेचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.