विशेष लेख : गटार नसलेला रस्ता जीर्ण झालेली कमान कसा वाढेल नगरीचा मान : मुरगुड करांची व्यथा

शब्दांकन : व्ही.आर भोसले
मुरगुड च्या गावभागातील
मुख्य रस्त्याचे काम सुरु आहे ., मारुती मंदिर ते भावेश्वरी मंदिर या रस्त्याला गटार नाही .तांब्याभर पाणी सांडले तरी त्याला निर्गत नाही .एखाद्या लहानग्यांने शू करायची म्हंटली तरी बाजूला गटार नाही .जवळपास एखादे स्वछतागृह नाही .
मंदिर मस्जिद हाकेच्या अंतरावर नांदत असूनही नियोजनाचा असा अभाव का?
असा नागरिकांना प्रश्न पडलाय .
इकडे एस टी स्टँड ला लागून असलेली पाटील नगरची कमान पूर्ण जीर्ण झालीय .
मुरगुडचे पहिले नगराध्यक्ष स्व.विठ्ठलराव पाटील यांचे नाव या नगरास दिले आहे
मुरगुडचे सुपुत्र व माजी मंत्री स्व. सदाशिवराव मंडलिक यांचे हस्ते हे नामकरण झाले आहे .
ही कमान शहराच्या अगदी दर्शनी भागात असून तिच्या उजव्या हाताला बस स्थानक व डाव्या हाताला ग्रामीण रुग्णालय आहे .समोर नगर परिषद इमारत असून तिच्या प्रांगणात शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा साकारत आहे .
अशा भव्य परिसरात लक्तरे पांघरून “ही कोण उभी “अशी कमानीची अवस्था झाली आहे .
कमानीखालून नगराचा मुख्य रस्ता जातो .हा रस्ता इतका रहदारीचा आहे की पोरे खिडकीतून वहाने मोजत असतात .मिनिटाला तीस का चाळीस अशी ती पैज लावत असतात .
असा हा रस्ता अवघा सोळा फूट रुंदीचा केलाय .दगड मुरूम टाकून केलेल्या साईड पट्टया.
,इथेही नागरिकांत नाराजी आहे.
शब्दांकन : व्ही.आर.भोसले ( मुरगुड )