ताज्या बातम्यामहाराष्ट्र

विशेष लेख : गंडा घालणारी नवी मालिका कौन बनेगा रोडपती

शब्दांकन: व्ही .आर .भोसले

टीव्हीवर अमिताभ बच्चन यांची ‘कौन बनेगा करोडपती ‘ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली आहे .

तीच वैशिष्ट्य म्हणजे विजेत्यास तिथल्या तिथे मोबाइल ने पैसे मिळतात पैसे पोचल्याचा टिक मार्क पहिला की स्पर्धकांचा चेहरा खुलून जातो ,
एक पैशाची गुंतवणुक न करता लाखो रुपये मिळून जातात .

मुरगुड शहरात व विशेषतः व्यापार पेठेत पैशाचा गंडा घालणाऱ्या अनधिकृत कंपन्यांनी कौन बनेगा रोडपती नावाची मालिका सुरू केली आहे .

काय आहे ही मालिका ,?

,लाख रुपये गुंतवून महिना वीस हजार घ्यायचे .कित्येकांनी किडुक मिडुक विकून लाखो रुपये गुंतवले .दोन तीन महिने पैसे मिळाले व नंतर बंद झाले .

बोगस कंपनीचा चाळीस टक्के फायदा .
गुंतवणूकदार तितक्याच तोट्यात .
यात कांही दलाल ही तयार झाले .भोळ्या भाबड्या गुंतवणुक दाराकडून पैसे घ्यायचे ,आपणच गुंतवायचे व त्याला पाच टक्के देऊन बाकीचे आपण ठेवून घ्यायचे .

घरबसल्या व कांही कामधंदा न करता पैसे मिळतात म्हंटल्यावर अनेकजण अडगे यात फसत गेले .
,करोड पती ऐवजी रोडपती बनण्याची वेळ त्यांच्या वर आली .

,,या वाटमारिला शेअर बाजारासारखे गोंडस नाव दिले आहे .कांही शिक्षकही यात आहेत .
कोरोना काळात घरी बसून दुसरा व्यवसाय तरी काय करायचा म्हणुन पगाराचे पैसे या घरबसल्या धंद्यात सरकारी नोकरदारांनी गुंतवले आणि फसले आहेत .

जाणकारांच्या माहितीनुसार वर्षभरात कोट्यवधींची गुंतवणूक या बेगडी शेअर बाजारात झाली आहे .

बक्षिसाचा आनंद तर राहोच पण होत नव्हतं ते गेल्याने रस्त्यावर यायची वेळ कांहीजणावर आली आहे .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks