विशेष लेख : चोर पोलीस चा सरकारी खेळ.

शब्दांकन : व्ही. आर .भोसले
चोर पोलीस हा खेळ पोरांच्या आवडीचा .एकानं चोर तर दुसऱ्यानं पोलिस .
महाराष्ट्रात असा खेळ गेले बरेच दिवस चालू आहे .या पोरखेळात पुरावा ,आरोप असलं काय लागत नाही .
मनात आलं की पोलिसांना आदेश देणें आणि कोणाला तरी चोर समजून ठाण्यात आणणे ,
असा सरकारी खेळ सुरू झालाय .
खरं तर सरकारचं काम काय हेच समजेना झालंय .
कंगना राणावत ,अर्णव गोस्वामी ,नारायण राणे ,राणेंची मुले ,राणा दांपत्य यांनी ना कोठे दरोडा घातला ,ना जाळपोळ केली ,ना खून मारामाऱ्या केल्या .
यांनी फक्त मुख्यमंत्री यांना आव्हान दिलं .लोकशाहीने जी सप्त स्वातंत्र्ये प्रत्येक नागरिकांला दिली आहेत त्यात एक म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे होय .
जरा आठवा ,कंगणाने काय म्हंटले
“मुंबईला पी ओ के करून ठेवलंय .याचा अर्थ पाक व्याप्त काश्मीर सारखं करून ठेवलंय .
हे सी एम ला झोंबले म्हणून लगेच तिला देशद्रोही ठरवले .ते जमलं नाही म्हणून तिच्या घराला अतिक्रमित ठरवून पाडले .
पोलिसांचा ससेमिरा मागे लावला .
अर्णव काय म्हणाला ?
“सुशांत रजपूत ची आत्महत्या नसून खून आहे त्याची सीबीआय चौकशी व्हावी .”
त्याच्यावर बिनबुडाचा नाईक प्रकरण लावून तुरुंगात टाकलं .
नारायण राणें तर केंद्रीय मंत्री .ते म्हणाले
“सी एम च्या अज्ञात गोष्टी बाहेर काढाव्या लागतील “
त्यांनी त्या कांही काढल्या नाहीत ,पण नाशिक पोलिसांकडून त्यांना अटक केली .
नितेश राणे च्या बाबतीत तसंच .
राज ठाकरे नी तर भोंग्या च्या बाबतीत इशाराच दिला आहे .जाहीर सभेत वरील सर्वांच्या पेक्षा गंभीर आरोप सी एम सकट अनेक नेत्यांवर केलेत .
त्यांना अटक करायची मात्र हिंमत नाही .कारण त्यांच्या मागे हजारो अनुयायी आहेत .
हनुमान चालीसाने तर फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशात खळबळ माजवलीय .
त्यांच्या ‘चालीसा’ ला महाआरतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला .पण अटक करायची हिंमत झाली नाही .
राणा दाम्पत्याने तर काय केलं .?
हनुमान चालीसा मातोश्री समोर म्हणायची इच्छा व्यक्त केली .
त्यांना १५३ कलम लावून खार पोलिसांकरवी अटक केली .
याला पोरखेळ म्हणायचं नाही तर काय म्हणायचं ?
दाऊद च्या कितीतरी मालमत्ता अतिक्रमित आहेत ,त्यांना हात लावायची हिंमत सरकार मध्ये नाही.
अर्णव गोसावींन एका संशयीत मृत्यू च्या चौकशीची मागणी केली .
राणा दाम्पत्याने तर फक्त प्रार्थना म्हणायला सांगितलं
या सर्वांना जी वागणूक दिली त्याचं एकच उत्तर आहे ‘कर्तृत्वाची कमतरता ,वृथा अहंकार
यातून जन्माला आलाय सरकारी चोर पोलिस चा खेळ .
शब्दांकन : व्ही. आर .भोसले