ताज्या बातम्यामहाराष्ट्र
जांबरे शाळेला सभापतींची भेट; अनाथ मुलींचे स्वीकारले पालकत्व.

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
जांबरे ता. चंदगड येथील प्राथमिक शाळेला पंचायत समिती सभापती ऍडवोकेट अनंत कांबळे व शिक्षण विस्तार अधिकारी एम टी कांबळे यांनी भेट देवून शैक्षणिक प्रगतीचा आढावा इयत्ता निहाय घेतला तर गणित व इंग्रजी विषयांची चाचपणी केली तर अलीकडील काळात शाळेचा झालेला भौतिक बदल पाहून त्यांनी सर्व ग्रामस्थ व शिक्षक यांचे आभार मानले दुर्गम भागातील शाळेचा झालेला विकास हा नक्कीच कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले भेटी दरम्यान सभापती ऍडओकेट अनंत कांबळे यांनी शाळेतील अनाथ मुले समृद्धी गवस,स्वप्नील गवस यांचे पालकत्व स्वीकारून त्यांना तात्काळ हजार रुपयांची मदतही दिली मुख्याध्यापक दीपक गोरे यांनी आभार मानले यावेळी गणेश आकलोड उपस्थित होते.