सोनाळी हत्या प्रकरण : आरोपीचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये; कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सोनाळी (ता. कागल) येथील वरद रवींद्र पाटील या बालकाच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी मारुती ऊर्फ महादेव तुकाराम वैद्य याला तत्काळ फाशी झाली पाहिजे. यासाठी आरोपीचे वकीलपत्र कोणीही स्वीकारू नये, अशी मागणी कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. शिवाय मुरगूड पोलिसांनी या खुनाचा तपास जलदगतीने केल्याबद्दल त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष विकास पाटील यांनी, वरद रवींद्र पाटील या बालकाचा स्वतःला मूल होत नाही म्हणून खून करणाऱ्या मारुती वैद्य या नराधमास फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली. निवेदन देतेवेळी दिग्विजय प्रवीणसिंह पाटील, शहर अध्यक्ष रणजित सूर्यवंशी पाटील, नगरसेवक रविराज परीट, माजी सरपंच देवानंद पाटील, राजू आमते, भडगावचे उपसरपंच बी. एम. पाटील, विशाल चौगुले, धनाजी पाटील, रणजित मगदूम राजेंद्र पाटील, दौलतवाडीचे सरपंच विठ्ठल जाधव, सर्जेराव कानडे, प्रकाश भिउगडे, संदीप जाधव, रघुनाथ अस्वले आदी उपस्थित होते.