हसणे धनगरवाडा येथील धावणे स्पर्धेत लहान गटातून सोहम कोकरे तर मोठया गटातून शाम कोकरे प्रथम

कुडूत्री प्रतिनिधी :
अनंतशांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांचे वतीने हसणे धनगरवाडा (ता. राधानगरी) येथे प्रजासत्ताक दिनानिमित्य धावणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.डोंगराळ दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा कलागुणांना,व शारिरीक व्यायामाला वाव मिळावा या उद्देशातून ही स्पर्धा घेण्यात आली होती.आजपर्यंत संस्थेने एक हजारहून अधिक उपक्रम डोंगराळ आणि दुर्गम भागात राबविले आहेत.
स्पर्धेसाठी संस्थापक अध्यक्ष भगवान गुरव ,अध्यक्ष डॉ .माधुरी खोत,सचिव अरुणा पाटील,राधानगरी भुदरगड विभागीय अध्यक्ष व निवड समिती प्रमुख पत्रकार सुभाष चौगले,अनंतशांती सर्व संचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेचा निकाल असा – १ली ते दुसरी गट -प्रथम कु.सोहम घाटू कोकरे
द्वितीय – कुमारी.शिवानी भगवान कोकरे, तृतीय -कु.सुनिल गोविंद कोकरे
उत्तेजनार्थ -कु.साक्षी धाकू कोकरे आदी तर इयत्ता ३ री ते ४ थी गटातुन
प्रथम -कु.शाम धुळू कोकरे
द्वितीय -कु.राम धुळू कोकरे
तृतीय -कु.सार्थक गोविंद कोकरे
उत्तेजनार्थ -कुमारी -समृद्धी भगवान कोकरे यानी अनुक्रमे क्रमांक पटकावलेत.
संस्थेमार्फत विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.स्पर्धेसाठी पंच म्हणून मोरजकर सर,मुदुगडे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.