शिवतेज कडून समाज हिताचे उपक्रम : ऍड सतिश चौगले

कुडूत्री प्रतिनिधी :
गेले अनेक वर्षे शिवतेज तरुण मंडळाने समाज हिताचे उपक्रम राबवले असून हे मंडळ सलग दोन वर्षे गणराया अवॉर्डचे मानकरी ठरले आहेत.या पुढे मंडळ समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात कमी पडणार नाही असे मत ऍड सतिश चौगले यांनी कुडूत्री (ता.राधानगरी) शिवतेज मंडळाच्या वतीने एन. एम. एम. एस. परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी सत्कार प्रसंगी केले.
ते पुढे म्हणाले की,कुडूत्री ही संतांची भूमी असून या भूमीत कलावंत जन्माला आले आहेत.सर्वच क्षेत्रात येथील युवक चमकत असून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
कार्यक्रमात सुरवातीला मंडळातील आकस्मिक निधन झालेल्या कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहिन्यात आली. यानंतर १५ विद्यार्थी आणि दोन गुणवंत शिक्षकांचा सत्कार सन्मानपत्र आणि ट्रॉफी देऊन करण्यात आला.यामध्ये वैष्णवी चौगले, शुभांगी चौगले,अथर्व चौगले,श्रेयस चौगले, रेणू मोरे,आकाश डवर, अपेक्षा चौगले,गणेश चौगले, अथर्व पाटील,समर्थ चौगले,तेजस कांबळे,कादंबरी कांबळे,विराज गुरव,समर्थ चौगले,अमृता साळोखे,शिक्षक वैभव येलेकर,व सुनिल आरडे आदी. या प्रसंगी सुनिल आरडे, वैभव चौगले,महेश चौगले आदीनी आपली मनोगते व्यक्त केलीत.
कार्यक्रमास अध्यक्ष शिवाजी घुगरे,उपाध्यक्ष लहू कदम, सचिव रोहित चौगले,खजानिस रोहित पारकर,राम चौगले आदी मंडळाची सल्लागार कमिटी व सर्व सदस्य उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रदीप येलेकर सर यांनी तर आभार रोहित पारकर यांनी मानले.