ताज्या बातम्याराजकीयसामाजिक

सामाजिक कार्यकर्ते किरण सिद्धाप्पा पाटील व वैशाली किरण पाटील यांच्या वतीने रीगंरोड भागात सलग 8 दिवस अखंडपणे पाणी वाटप केले

कोल्हापुर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

मागील 10 दिवसा पासून सुरु असलेल्या पावसाच्या हाहाकाराने सामान्य जनजीवनाची दैना उडवून दिली. कधी नव्हे इतका प्रचंड पाऊस महाराष्ट्र तसेच कोल्हापूर जिल्ह्यात पडला. सगळी कड़े पानीच पाणी झाले. पण या पावसाने कोल्हापूर ला पाणी पुरवठा करणारे पम्पिंग स्टेशन पाण्याख़ाली गेले. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकाने बेमुदत काळासाठी पाणी पुरवठा करता येणार नाही व टैंकर ने प्रत्येक भागात पाणी पुरवठा केला जाईल असे जाहिर केले. संपूर्ण कोल्हापूर मधे टँकर पोहोचवने आणि सर्वाना पाणी मिळणे तितकेच अवघड. हिच समस्या दूर करण्यासाठी फुलेवाड़ी रिंगरोड चे प्रत्येक सामजिक कार्य असो कोणत्याही संकटात नेहमी पुढे आसणारे सामाजिक कार्यकर्ते श्री.किरण सिद्धाप्पा पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ.वैशाली किरण पाटील व त्यांचे परिवार हे यांनी पालकमंत्री नामदार सतेज उर्फ बंटी पाटील (साहेब) आमदार ऋतुराज पाटील (दादा) ,माजी स्थायी सभापती मा.शारंगधर देशमुख (साहेब) यांच्या सहकार्याने त्यांनी भागातील नागरिकांना पाणी पोहच केले ,या कामात त्यांना त्यांचे सहकारी मित्र संताजी रानगे (वाशी) श्री.आझाद कुलकर्णी, श्री.बाजीराव भाट, श्री.राहुल पाटील, दत्ता रानगे (भाऊ) संदीप पुजारी ,किरण रानगे,मुरली हजारे, दत्ता मंगेश रानगे श्री.सलीम मुल्ला, श्री.प्रदीप चिखलकर , श्री.शाहिद मोमीन,नागेश साखळकर, जयंत बाजारी,सुरेश जानकर, श्री.अभिजीत माने, कु.स्वराज भाट, श्री.संजय वनकुंद्रे,सागर महाडिक, कु.प्रथमेश पाटील यांनी या उपक्रम सहभागी होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks