जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते सुनील तेली यांचा वाढदिवस साजरा.

गारगोटी प्रतिनिधी :
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे शेणगांव (ता. भुदरगड) येथील सुनील बाळासो तेली यांचा वाढदिवस जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सुनील तेली यांनी शेणगांव गावामध्ये अनेक गरजू लोकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. त्याबद्दल त्यांचा जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील व ग्रामस्थांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मच्छिंद्र मुगडे यांनी यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
यावेळी देवराज बारदेस्कर, ग्रामपंचायत सदस्य भैरवनाथ कुंभार, सदानंद आमणगी, विश्वनाथ कुंभार, निवृत्ती तेली, प्रकाश जाबशेट्टी, विजय विभुते, बाळासो मेनसे, रमेश तेली, अवधूत विभुते, सुनील हाळदे, भास्कर कुंभार, आशिष कुंभार, दीपक कुंभार, शिवप्रसाद तेली, रणवीर कुंभार, बाजीराव कुंभार, वसंत तेली, नामदेव येडूरे, सागर कुंभार, विकास कुंभार यांच्यासह शेणगांव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.